Subscribe Us

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

 अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
प्रतिनिधी:दिलदार शेख
-------------------------------------
मारेगांव तालुक्यापासुन दोन किलोमीटर असलेल्या पेट्रोल पंप जवळ सकाळी फिरण्यासाठी जात असताना, अज्ञात वाहनाच्या धडकेने  राकेश याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पेट्रोल पंप जवळ घडली आहे.


 ही घटना सकाळी सहाच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने राकेश ढुमणे याचा जागीच मृत्यू झाला आहे. राकेश ढुमणे  रा .मांगरुळ यांना मारेगांव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मुत्यु घोषित केले. व
  शव विच्छेदन करण्या करिता मारेगांव  ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. राकेश   यांच्या पश्चात पत्नी,आई वडील दोन मुले असा अपत्य परिवार आहे. राकेश यांच्या अपघात घटनेने जाण्याने मंगरूळ येथील शोकाकुल वातावरणात आहे.

सदर घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशन जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी, जमादार आनंद आचलेवार  हे करत आहे