Subscribe Us

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

सार्वजनिक शौचालयात घाणीचे साम्राज्य

सार्वजनिक शौचालयात घाणीचे साम्राज्य

स्थानिक नगरपंचायत कार्यालयाच्या हद्दीतील बस थांब्या जवळ असलेल्या संडास, मूत्रिघरामध्ये घाणीचे साम्राज्य आहे. 

महिलाची कुचंबना , निर्मल भारतला उडविला फज्जा
  मारेगाव टाईम्स वेब डेस्क
 स्थानिक नगरपंचायतच्या हद्दीतील बस थांब्या जवळ असलेल्या संडास, मूत्रिघरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने महिलाची कुचंबना होत असतांना दिसत असुन सुध्दा नगरपंचायतने कुठलीही साफ सफाई केली नसल्याने  मुत्रारीला जाणाऱ्या
     नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन नागरिकांना तोडावर रूमाल लावून मुत्रारीला जावे लागत असुन नगरपंचायत कुंभकर्णी झोपे मध्ये असल्याचे दिसून येते आहे.
  मूत्रिघराचा वापर १०५खेड्यातील व येणाऱ्या जाणारे प्रवासी व नागरिक किंवा  कर्मचारी सध्या तरी करूच शकत नाही इतकी घाण पसरलेली आहे.  मारेगांव  तालुक्यातील प्रवासी विविध कामानिमित्त विविध कार्यालयात नागरिक कामासाठी चकरा माराव्या लागतात.
       बस थांब्या परिसरात प्रवासी व नागरीकासाठी सार्वजनिक शौचालय, मूत्रिघर बाधण्यात आले आहे. शौचालय मध्ये घाण असल्याने महिलांना व कर्मचाऱ्यांना शौचालय, लघुशंकेकरिता कुठे जावे हा प्रश्न नागरिका समोर  पडला असुन एकीकडे नगरपंचायत
 प्रधानमंत्री स्वच्छता मोहीम राबविते तर दुसरीकडे घाणीचे साम्राज्य असते याकडे जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन  दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी मारेगांव तालुकावासीयांनी केली आहे.