Subscribe Us

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

मारेगाव तालुक्यात १४ पॉझिटीव्ह..शहरात ०९

धक्कादायक...
कोरोनाचा आलेख वाढतोय !
मारेगाव तालुक्यात १४ पॉझिटीव्ह..शहरात ०९
    मारेगाव : सचिन मेश्राम 
   कोरोना संसर्गाचा आलेख मारेगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे.आज सोमवार ला प्राप्त अहवालात १४ जनांना कवेत घेतले.मारेगाव शहराचा आकडा  ०९ आहे.त्यामुळे चिंतेचे सावट पसरत आहे.
      मारेगाव तालुक्याला  कोरोना संसर्गजन्य विषाणुने दिवसागणिक कवेत घेण्याची प्रक्रीया कायम ठेवत आज प्राप्त आरोग्य विभागाच्या अहवालात मारेगाव प्रभाग क्रमांक सहा मध्ये तब्बल ०८ जन तर प्रभाग पाच मध्ये एक जन पॉझिटीव्ह निघालेत.यासोबत कोलगाव येथे एक,गाडेगाव १ व करनवाडी येथे तिघे पॉझिटीव्ह निघालेत यात एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
    मारेगाव तालुक्यात कोरोना प्रभाव वाढत असतांना बाधितांचा फुगत असलेल्या आकडेवारीने चिंतेचे सावट निर्माण होत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासना कडुन करण्यात आले आहे.